राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून अभिनेता ‘उमेश कामत’चा फोटो; वृत्तवाहिन्यांना दिला कारवाईचा इशारा

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती “राज कुंद्रा’ याला पोलिसांनी अटक केली. अश्‍लील चित्रपटांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतला असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अगोदरच राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला अटक करण्यात आली होती.

मात्र आरोपीशी असलेल्या नामसाधर्म्यातून घोळ घालत काही वृत्तवाहिन्यांनी वृत्तांकन करताना मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘उमेश कामत’ याचा फोटो प्रसारित केला आहे. त्यामुळे अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियातून संताप व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला आहे. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा उमेशने आपल्या इंस्ग्रामवर शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

काय आहे उमेश कामतची पोस्ट?

‘आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.