भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंचे संपूर्ण श्रेय विराटने अनुष्काला दिले. विराटचे हे फोटो चाहत्यांना फारच भावले आहेत. अनेक चाहते विराटपेक्षा अनुष्काच्या फोटोग्राफीचे कौतुक करताना दिसत आहेत. तर काही जणांनी रात्रीचा फोटो अंधुक आल्याने अनुष्काला ट्रोलही केले आहे. फोटोग्राफी चांगली आहे. परंतु कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे असे वाटते, असे एका चाहत्याने म्हंटले आहे.
दरम्यान, विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेसोबत टी-२० सामने खेळत आहे. याआधीही त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याचे क्रेडिट अनुष्काला दिले होते. ‘कॉट इन द मोमेंट, पिक क्रेडिट अनुष्का शर्मा’, अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली होती.