“शिवस्मित’ने कमी काळात विश्‍वासार्हता मिळवली : शिंदे

कर्जत – कोणत्याही आर्थिक प्रगतीच्या मुळाशी सामाजिक हेतू असावा लागतो. समाजाभिमुख सेवा दिल्या तर निश्‍चितच उन्नती साधता येते. शिवस्मितने ग्रामीण भागात कमी काळात विश्‍वासार्हता मिळवली आहे. त्यामुळे पुढील काळ हा बॅंकेला प्रगतीपथाकडे घेऊन जाणार असेल असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. कुळधरण येथील शिवस्मित अर्बन बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि गणवेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष धनराज कोपनर,पोलीस पाटील समीर जगताप, मंगेश जगताप, पिंपळवाडीचे सरपंच शिवाजी चोरमले, अशोक सुपेकर, प्रशांत औटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
शिवस्मितचे चेअरमन गोकुळ पवार यांनी प्रास्ताविकातून बॅंकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बॅंकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह खातेधारक उपस्थित होते. सूत्रसंचालन मॅनेजर नितीन नेवडे यांनी केले. चेअरमन गोकुळ पवार यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.