Chhatrapati Shivaji Maharaj Movie : अभिनेते रितेश देशमुख यांच्यानंतर आता छत्रपती शिवाजी महारांजावर बनवण्यात येणाऱ्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाचा शुभारंभ पार पडला. संदीप सिंह यांच्या दिग्दर्शनात पदार्पण करणारा हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे.
भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले आणि ,चित्रपट निर्माते संदीप सिंग यांना शुभेच्छा दिल्या. 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, द प्राइड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज नावाचा हा चित्रपट महाराजांचे जीवनकार्य मोठ्या पडद्यावर दाखवणार आहे. | Chhatrapati Shivaji Maharaj Movie
संदीप सिंगच्या यांचा हा पहिलाच बिग बजेट सिनेमा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले तसेच त्यांनी केलेल्या अनेक लढाया या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मराठी अशा भाषांमध्ये हा चित्रपट बनवला जाणार आहे. | Chhatrapati Shivaji Maharaj Movie
“माझा पहिला मेगा बजेट चित्रपट – द प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज यासाठी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्यासाठी मला 23 वर्षे कठोर संघर्ष करावा लागला असल्याचे संदीप सिंग यांनी यावेळी सांगितले.तसेच 2019 पासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याचे सिंग यांनी यावेळी सांगितले.
मला आश्चर्य वाटते की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर एकही हिंदी चित्रपट बनलेला नाही. याचा विचार कोणत्याही चित्रपट निर्मात्याने कसा केला नाही? तामिळ, तेलुगू, कन्नड आणि इंग्रजी सारख्या इतर भाषांमध्येही या दिग्गज शासकावर एकही चित्रपट आलेला नाही अशी खंत देखील यावेळी सिंग यांनी व्यक्त केली. | Chhatrapati Shivaji Maharaj Movie
या चित्रपटातील कलाकारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.इतर टीम सदस्यांमध्ये, छायाचित्रण दिग्दर्शक असीम बजाज, नृत्यदिग्दर्शक गणेश हेगडे, कॉस्च्युम डिझायनर शीतल शर्मा, प्रॉडक्शन डिझायनर संदीप शरद रावडे आणि कास्टिंग डायरेक्टर कविश सिन्हा संगीतकार देवी श्री प्रसाद यांचा समावेश आहे. हा सिनेमा 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.