NCP Crisis| अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला दिलासा मिळू शकलेला नाही.
मात्र, याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेची तपासणी करण्यास तयार असल्याचे न्यायालयाने सांगितले. तसेच अजित पवार गटाला (Ajit Pawar) आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावून 2 आठवड्यांत उत्तर मागितले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी निश्चित केली आहे.
Supreme Court issues notice on a plea filed by veteran leader Sharad Pawar of NCP against the order of Election Commission of India (ECI) officially recognising Ajit Pawar faction as the ‘real’ Nationalist Congress Party (NCP).
Supreme Court says February 7 order of ECI granting… pic.twitter.com/vwSCg6f1LF
— ANI (@ANI) February 19, 2024
शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. असे असतानाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आला. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला की, निवडणूक आयोगाने आम्हाला तात्पुरते नाव दिले आहे.
काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. नंतर निवडणुकांची तयारी सुरू होईल. आम्ही नाव आणि चिन्हाशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे आम्हाला दिलेले नाव कायम ठेवा आणि चिन्ह द्या, असा युक्तीवाद केला. त्यावर कोर्टाने हा निकाल दिला आहे.
शरद पवार गटाच्या मागणीवर न्या. विश्वनाथन म्हणाले, मुकुल रोहतगी तुम्ही लक्षात घ्या. निवडणूक आयोगाच्या आदेशात काय लिहिले? दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरले नाही. आयोगाचा निष्कर्ष काय आहे की, तुम्ही दोघांनी घटना पाळली नाही. फूट वगळून विलीनीकरणाची तरतूद करण्यात आली, त्याचा उद्देश काय होता, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला.
नवी चिन्हासाठी निवडणूक आयोगात जा –
निवडणूक आयोगाने 7 फेब्रुवारी रोजी शरद पवार गटाला जे नाव दिले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार ते निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावे. तसेच शरद पवार हे नव्या निवडणूक चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगात जाऊ शकतात. शरद पवार गटाने अर्ज केल्यानंतर आठवड्याभरात निवडणूक आयोगने यावर निर्णय द्यावा, असे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले.