नवी दिल्ली – एका दिवसाच्या दिलास्यानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर 76 ते 85 पैशांनी वाढला आहे, तर डिझेलचा दरही 76 वरून 85 पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोल 117.57 रुपये लीटरजवळ पोहोचले आहे. तर डिझेलचा दर 100 रुपयांवर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 102.61 रुपये प्रति लिटर तर डिझेल 93.87 रुपये प्रतिलिटर गेले आहे. 12 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 10 वेळा वाढ झाली आहे.
पुणे शहरात पेट्रोल 117.04 वर पोहचले आहे तर डिझेलदर 99.77 झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 117.57 रुपये आणि डिझेलचा दर 101.79 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 112.19 रुपये आहे तर डिझेलची किंमत 97.02 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 108.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.28 रुपये प्रति लिटर आहे.