इंदापूर -इंदापूर शहरामधील नागरिकांची रस्ते ड्रेनेज तसेच सुशोभिकरण आदी कामांबद्दल सततची मागणी होत होती. या मागणीचा विचार करता दलितवस्ती तसेच दलितेतर व नगरोत्थान या निधीअंतर्गत इंदापूर शहरातील विविध विकास कामांना सुमारे 10 कोटी 45 लाखे रुपये इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.
इंदापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, साठेनगर व लोकमान्यनगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कॉंक्रिट रस्ते या कामाकरिता 2 कोटी 10 लाख निधी व नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत डॉ. आंबेडकर नगर साठेनगर व लोकमान्य नगर येथे अंडरग्राउंड ड्रेनेज करिता 68 लाख 99 हजार तसेच प्रभाग क्रमांक 7 अंतर्गत बावडा
वेस येथील श्री संत सावतामाळी मंदिरासमोर समाज मंदिर बांधणे या कामाकरिता 1 कोटी 14 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच इंदापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत इंदापूर शहरातील एकूण 41 कामांना 6 कोटी 62 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.