मुंबई – मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी पुण्यात झालेल्या मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी बोलताना आजचं भाषण केवळ ट्रेलर आहे, 2 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात पूर्ण पिक्चर असेल, असे म्हटले होते. त्यानंतरच राज ठाकरेंच्या आज (दि. 2) पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आजच्या या सभेसाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी केले असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंची ही सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर येथे होणार आहे. त्यापूर्वी मनसेकडून शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी केली आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे’ असं या बॅनरवर लिहण्यात आला आहे.
Raj Thackeray यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणासाठी मनसेचा टिझर….@RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/fGuiZ2eXor
— Abhishek karande (@Abhishekkaran16) March 31, 2022
तसेच, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आजच्या भाषणाचा एक छोटासा टिझरही बनवण्यात आला आहे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिकसह पुण्यातला राज ठाकरेंचा बाईट लावण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे म्हणतात, “आज हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर 2 एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाढव्याला..” असा आवाज त्याला देण्यात आला आहे. सोबतच टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल-ताशांचा आवाजही देण्यात आला आहे. सध्या मनसेचा हा टिझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला हाच व्हिडिओ दिसून येत आहे.