नवी दिल्ली -करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने केंद्र सरकारने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली जारी केली. त्यानुसार, अवर सचिव दर्जाखालील 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात आली आहे.
केंद्र सरकारशी संबंधित कार्यालयांमधील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवली जाणार आहे. अपंग कर्मचारी आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयांत उपस्थित राहणे अनिवार्य नसेल.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयांत उपस्थित राहण्याची गरज नसेल. कार्यालयांमध्ये गर्दी होणार नाही यादृष्टीने कामकाजाच्या वेळा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित नियमावली केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने जारी केली.