मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 12,160 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1748 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज 68 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 578 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
तसेच दिवसभरात 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 52 हजार 422 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.