मुंबई,- डिसेंबर महिन्यात टाटा माटर्सच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर ही कंपनी विक्रीत आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे सोमवारी या कंपनीच्या शेअरच्या भावात 3 टक्क्याची वाढ होऊन शेअरचा भाव 496 रुपयांवर गेला.
डिसेंबर महिन्यात या कंपनीच्या विक्रीत 50 टक्क्यांची वाढ होऊन या कंपनीने 35,299 वाहने विकली. सुट्या भागाच्या तुटवड्यामुळे इतर कंपन्याच्या विक्रीत घट झाली असतांनाही या कंपनीच्या विक्रीत मात्र वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळातही कंपनीची विक्री वाढण्याची शक्यता असल्याचे गुंवणूदारांना वाटते.
त्यामुळे या कंपनीच्या शेअरची खरेदी वाढली असल्याचे ब्राकर्सनी सांगितले. कंपनीने सादर केलेल्या नव्या वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर कंपनीची ईलेक्ट्रीक वाहने मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत.