मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सोनू सूद’ लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. घरी पोहोचवण्यासाठी लोक त्याचे आभार मानत आहे.
याच दरम्यान, आपल्या समाजसेवेमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिरातींसाठी नवा चेहरा बनला आहे. समाजमाध्यमांवर सर्वच स्तरातील कौतुकामुळे ‘पेप्सी’ कंपनीने त्याला करारबद्ध केले आहे. इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अभिनेता सोनू सूद आतापर्यंत ‘पेप्सी’च्या जाहिरातीसाठी ऑफर दिली आहे. लवकरच तो ‘पेप्सी’च्या जाहिरातीत झळकत आहे. मात्र नव्या जाहिरातीत त्याऐवजी सोनू सूद दिसणार आहे.
View this post on Instagram
Rishi sir, you were the reason I learnt this melody🙏 . आपका यह KARZ मुझ पर हमेशा रहेगा । 💔
लॉक डाउनच्या काळात स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाता यावे यासाठी बसेस तरतूद करत त्यांच्या पाठी ठाम उभा राहिलेला सोनू आणखीहीकाही जाहिरातींमध्ये लवकरच झळकणार आहे.