बारामती : कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी सलग दोन टर्म आमदार असलेले राम शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राम शिंदे यांच्या एका विधानांवरून पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.
राम शिंदे यांनी,”माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले” असल्याचा आरोप केल्यानंतर आता रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना, ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहीत नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू” असे म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना, “राम शिदे साहेब पुढया सोडू नका, खेकड्याची चाल लोकं स्वीकारत नाहीत, हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू!” असे म्हणत राहोत पवार यांनी राम शिंदे याना ओपन चॅलेंज दिले आहे. दरम्यान, आता पवारांच्या या आव्हानाला शिंदे कसे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे आहे.