मुंबई – देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असणारी पेटीएम यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या आसपास देशातील सर्वात मोठा आयपीओ आणणार आहे म्हणजेच भागविक्री करणार आहे. काही माध्यामानी दिलेल्या माहितीनुसार पेटीएमने आयपीओतून प्राथमिक बाजारातून 3 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 22,000 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्सचे संचालक मंडळ आयपीओला मान्यता देण्यासाठी लवकरच बैठक घेणार आहे. या आयपीओद्वारे पेटीएमने आपले मूल्यांकन 25 ते 30 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.80 लाख कोटी वरुन ते वाढवून 2.20 लाख कोटी रुपये करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
पेटीएमच्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये बार्कशायर हॅथवे, जपानची गुंतवणूक असलेली कंपनी सॉफ्टबॅंक ग्रुप आणि चीनच्या अलिबाबा ग्रुपमधील अँट ग्रुप यांचा समावेश असल्यो बोलले जाते.
या आयपीओमध्ये नवीन शेअर्ससोबत कंपनी प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदाराद्वारे शेअर विक्रीसाठी ऑफर देतील जेणेकरुन काही कंपन्यांना यातून बाहेर पडता येणार आहे.
पेटीएमच्या आयपीओसाठी निवडलेल्या बॅंकांमध्ये मॉर्गन स्टेनली, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन यासारख्या गुंतवणूकदारांचा समावेश असणार आहे.
मॉर्गन स्टेनली लीड मॅनेजर बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे.गुंतवणूकदारांसाठी यावर्षी पेटीएमने मोठी संधी उपलब्ध केली आहे, असे समजले जात आहे.