फ्रें ड्स ही 90च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. याच सुपरहिट मालिकेचे रियुनिअन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
फ्रेंड्स : द रियुनियन ही विशेष मालिका नुकतीच झीवर प्रदर्शित झाली अन् आश्चर्याची बाब म्हणजे त्यालादेखील भारतीय प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अगदी पहिल्या नऊ तासांत तब्बल 10 लाख लोकांनी पेड सबस्क्रिप्शन घेऊन ही मालिका पाहिली.
“फ्रेंड्स : द रियुनियन’चा संपूर्ण भाग 104 मिनिटांचा आहे. यामध्ये जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वाइमर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. शिवाय जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेलक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला युसूफजाई पाहुण्यांच्या भूमिकेत झळकले आहेत.