Pawan Singh | star Pracharak । Lok Sabha Election 2024 – भारतीय जनता पार्टीने मंगळवारी बिहारसाठीच्या आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रूडी आदी मोठी नावे दिसली, मात्र भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांचे नाव त्यातून गायब होते. वास्तविक भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर केली तेंव्हा त्यात पवन सिंह यांचा समावेश होता.
मात्र आता त्यांचे बिहारच्या उमेदवारांच्याच काय तर प्रचारकांच्याही यादीत नाव नाही. एकुणात भाजपने पवन सिंह यांना आउट केले असल्याचे मानले जाते आहे. बिहारमध्ये पवन सिंह याची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. वास्तविक भाजपच्या उमेदवारांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्यासाठी पवन हेच स्टार प्रचारक आहेत.
तथापि, भाजपने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचे कारण म्हणजे पक्षाची त्यांच्यावरची नाराजी. बंगालमधून जेंव्हा पक्षाने पवन सिंहचे तिकीट जाहीर केले होते तेंव्हा त्याने ते नाकारले. । Pawan Singh | star Pracharak । Lok Sabha Election 2024
नंतर काही दिवसांनी त्याने बिहार किंवा झारखंडमधूनही आपली लढण्याची तयारी असल्याचे व कोणते मतदार संघ त्याला हवे आहेत त्याचे संकेत जाहीर मुलाखतीतून दिले. त्याकडे भाजपने दुर्लक्ष केले आहे.
पवन सिंह यांच्यापेक्षा मनोज तिवारी यांना बिहारमध्ये भाजप अधिक महत्व देतो आहे. मुळात मनोज तिवारी हे दिल्लीत पक्षाचे उमेदवार आहेत. यांच्या व्यतिरिक्त भोजपुरी सुपरस्टा रवि किशन आणि दिनेश यादव उर्फ निरहुआ हेही भाजपचे खासदार आहेत. तथापि, भाजपचा सगळ्यांत जास्त भरवसा मनोज तिवारी यांच्यावर आहे. । Pawan Singh | star Pracharak । Lok Sabha Election 2024