नगर – अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघास कोतवाली पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडील हिरवट रंगाचा सुका गांजा 75 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.7) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपास चौकाजवळ कांदा मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करण्यात आली.
आरोपी मझर रहिम खान (वय- 33, रा.पठाण कॉम्प्लक्सचे मागे, भाजी बाजार, घोडनदी, शिरुर, जि.पुणे) व सागर रामचंद्र धानापुरे (वय-19, एस.टी.कॉलनी, सूर्यनगर, तपोवन रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडगाव बायपास चौकाजवळ कांदा मार्केट लगत दोघे दुचाकीवर बॅगेत काहीतरी अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचवून ओला-सुका गांजासह आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. बायपासला वाहतूक होताना असे प्रकार वारंवार घडत असतात.