पुणे – करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, या कालावधीत गंभीर आजार असलेल्या रुग्णांना वैद्यकीय कारणाकरिता आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. त्याकरिता सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर केल्यानंतर या प्रवासाची पोलीस प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने हे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातूून अन्य राज्यांत प्रवास करावयाचा असल्यास covid19mpass@gmail.com वर अर्ज करावे लागणार आहे. तर वैद्यकीय कारणास्तव महाराष्ट्रातच प्रवास करावयाचा असल्यास अर्जदार राहत असलेल्या भागाचे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्या नावे अर्ज करणे आवश्यक आहे.
या अर्जासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावे, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांक, चालकाचे नाव व संपर्क क्रमांक याशिवाय प्रवासाचा दिनांक, नियोजित मार्ग व अत्यावश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. करोना प्रतिबंधासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, होम कॉरंटाईन व्यक्तींना ही परवानगी दिली जाणार नाही.
My wife stucked in ichalkarnji due to lockdown now days she is feeling illness for that I personally goes to Ichalkarnji bring her with me after we come to solapur will test ourselves in government hospital with proper way please check look this with lots of empathy and grant me to travel to Ichalkarnji