#Ashes 2nd Test : कमिन्स,हॅझलवुड आणि लायनचा प्रभावी मारा, इंग्लंड सर्वबाद 228

लंडन (लॉर्ड्स) – ऍशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघास 228 धावसंख्येवर रोखले. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या दिवसअखेर 13 षटकात 1 बाद 30 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट 5 तर उस्मान ख्वाजा हा 18 धावांवर खेळत होते. डेव्हिड वॉर्नर 3 धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारून इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचरण केलं होतं. इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉय शून्यावर बाद होत तंबूत परतला, त्यानंतर जो रूट 14 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर रोरी बर्न्सने 53, जॉनी बेयर्सटोने 52 आणि क्रिस वोक्स यांनी 32 धावा करत इंग्लंडची धावसंख्या 228 पर्यंत नेली.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत पॅट कमिन्स,जोश हॅझलवुड आणि नॅथन लायन यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी 3 गडी बाद केले. पीटर सिडल याने 1 गडी बाद केला.

दरम्यान, ऍशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यास बुधवारपासून लॉर्डस मैदानावर सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवित पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.