नगर – पक्षीय राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी आपआपसातील मतभेद विसरुन सोबत राहून विकासकामे करावी. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 3 कोटी रुपयाची विकासकामे मंजूर आहेत. त्यासाठी माजी महापौर नगरसेवक अनिल बोरुडे हे नेहमीच विकासकामासाठी प्रयत्नशील असतात. बालिकाश्रम रस्त्याला पर्याय रस्ता म्हणून सिनानदी लगत रस्ता तयार करणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक 8 मधील माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या प्रयत्नातून सिनानदी वरील पुलाच्या कामांचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, गणेश कवडे, माजी नगरसेवक दगडू पवार, संजय शेंडगे, राहूल वाकळे, प्रदीप बोरुडे, नंदू बोरुडे, गोरख लक्ष्मण शिंदे, भैय्या रोहोकले, अक्षय बोरुडे, संजय बोरुडे, किशोर वाघ, शिवाजी बोरुडे, मारुती शिंदे, अभिजित बोरुडे, जालिंदर बोरुडे, काशिनाथ रोहोकले, आप्पा कदम, मुकुंद ताठे, शिवाजी कदम, शिरीष कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की, प्रभागाच्या विकासकामासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, प्रभागाचा कायापालट विकासकामातून करणार आहेत. त्यासाठी आम्ही चारही नगरसेवक एकत्र काम करत आहोत. पावसाळ्यामध्ये पुरामुळे सिनानदीवरील पूल वाहून गेल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. ती अडचण आता दूर होणार आहे.