पक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

पुणे : भाजपची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात पोहचली त्यावेळी पुणेकरांना त्यांच्या यात्रेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, सुरूवातीस मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना वाहतुक कोडींमुळे झालेल्या त्रासाबद्दल माफी मागिमली. तसेच आता पक्षाने मेगा भरती बंद केली असल्याचे म्हटले.

शनिवारी सायंकाळी महाजनादेश यात्रा पुण्यात दाखल झाल्यानंतर पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आमच्या सरकारमुळे राज्यातील जनतेने समाधान व्यक्‍त केले आहे. तसेच पुण्यातील विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचे काम सुरू आहे, नवीन एअरपोर्टसाठी जमीन अधिग्रहण करण्याचाही सरकारचा विचार सुरू आहे. तसेच मेट्रो, इलेक्‍ट्रिक बसेसदेखील सार्वजनिक वाहतूकीत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)