महाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन

सातारा – महाजनादेश यात्रेव्दारे आगामी विधानसभा निवडणूकांना सामोरे जावू पाहणाऱ्या भाजपला साताऱ्यात त्यांची महाजनादेश यात्राच अडचणीत आणण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा रविवारी दूपारी 3 वाजता साताऱ्यात येणार असताना वाहतूक पोलीसांनी सकाळपासूनच वाहतूक नियोजनाची भलतीच काळजी घेतली आहे.

रस्त्यावर उभे राहणाऱ्या नागरिकांना तसचे वाहनचालकांना हटकण्याचे प्रकार सकाळपासून सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीसांऐवजी महाजनादेशयात्रेबाबतच अधिक संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री जनतेचा आदेश स्विकारण्यासाठी येत आहेत की सातारकरांना त्रास देण्यासाठी? असा देखील संतप्त सवाल सातारकर नागरिक उपस्थित करित आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.