मुख्यमंत्र्यांना काळी ओढणी दाखविण्याचा प्रयत्न

कोथरूड  – मुख्यमंत्र्यांच्या जनादेशयात्रेच्या मार्गावर एरंडवण्यातील सुधीर फडके चौकात मनसेच्या दोन महिला व एक पुरुष कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्या रथासमोर काळ्या ओढण्या दाखवून निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली.

कोणाला काही कळण्याच्या आताच हा प्रकार घडला. त्यानंतर या महिला कार्यकर्त्या पाडळे पॅलेसच्या दिशेने पळत सुटल्या व त्यांच्या मागे पोलीस धावले. त्या दोघींना पाडळे पॅलेस चौकात ताब्यात घेऊन पोलीस जीपमध्ये बसवण्यात आले. त्यामुळे या जीप भोवती गर्दी जमा झाली होती. त्याठिकाणी फोटो व शूटिंग काढणाऱ्यांनाही पोलिसांनी हटकले.

या प्रकारामुळे एकच चर्चा सर्वत्र पसरली होती. यात्रा संपल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या लावण्या शिंदे, अनु पाटील व राम हाडे या तिघांना अलंकार पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.