मुंबई – सध्या करोनाचा सामना करण्यासाठी ऑटोरिक्षा चालक ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये प्लॅस्टिक किंवा कापडाचा वापर करून पार्टिशन करीत आहेत. आता बजाज ऑटो अशा रिक्षामध्ये योग्य प्रकारचे पार्टिशन तयार करून देणार आहे.
1 लाख रिक्षामध्ये पार्टिशन तयार करून देण्यासंदर्भात बजाज ऑटो आणि ओला यास खासगी सार्वजनिक वाहतूक कंपनीदरम्यान करार झाला आहे. आगामी काळात ऑटोरिक्षबरोबरच कारमध्ये अशा प्रकारचे प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. ग्राहक व चालकाची सुरक्षितता ध्यानात घेऊन हे पार्टिशन तयार करण्यात येणार आहे. बऱ्याच शहरातील वाहतूक आता पूर्ववत होऊ लागले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही करोना होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.