मुंबई – लॉकडाऊनच्या काळात पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मोठी मदत करून देशभर चर्चेत आलेला बॉलीवूडमधील अभिनेता सोनू सूद याने आता परत येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी नवीन ऍप काढले होते.
मेरे जन्मदिन के अवसर पे मेरे प्रवासी भाइयों के लिए https://t.co/UWWbpO77Cf का 3 लाख नौकरियों के लिए मेरा करार। ये सभी अच्छे वेतन, PF,ESI और अन्य लाभ प्रदान करते हैं। धन्यवाद् AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea और अन्य सभी का।#AbIndiaBanegaKamyaab pic.twitter.com/rjQ0rXnJAl
— sonu sood (@SonuSood) July 30, 2020
यातच, आज या रिअल लाईफमध्ये गरजूच्या मदतीला धावणाऱ्या सुपरस्टारचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्याने स्थलांतरीत मजुरांना आणखी मोठं गिफ्ट दिलं आहे. सोनू सूदने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे
त्याने ट्विट केले आहे की, ‘मी माझ्या प्रवासी भावांसाठी PravasiRojgar.com येथे ३ लाख नोकऱ्यांसाठी करार केला आहे. येथे काम करणाऱ्यांना चांगला पगार, PF, ESI आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत. AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea आणि इतर लोकांचे मनापासून आभार’ असे त्याने म्हटले आहे. माझ्या वाढदिवसा निमित्त सोनू सूदने ही माहिती ट्विट करत दिली आहे.