मंचर – आंबेगाव वसाहत (ता. आंबेगाव) येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात वक्तृत्त्व स्पर्धा व सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन नारोडी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक पारधी, मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नारोडी केंद्रातील प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक जाईबाई कोकणे, शोभा जाधव, अंजुषा राऊळ उपस्थित होते. सामान्य ज्ञान परीक्षेत इयत्ता पाचवी ते नववीच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान गटात प्रथम क्रमांक अथर्व मंगेश बुरुड, द्वितीय पार्थ सुधीर झावरे, तृतीय ध्रुव सुरेश कापडणीस; मोठ्या गटात प्रथम सोहम विनायक घोडेकर, द्वितीय रोहित गणेश मंजाळ, तृतीय वैष्णवी विजय शेळके,
साक्षी संतोष गायकवाड आणि सायली सुनील आकले या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सामान्य ज्ञान परीक्षेसाठी परीक्षक म्हणून राजेंद्र अरगडे, संजय वळसे, वैभव गायकवाड यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे नियोजन वैशाली काळे, वंदना मंडलिक, लक्ष्मी वाघ, गौरी वेताळ, संतोष पिंगळे, गुलाब बांगर, लक्ष्मण फलके, सुभाष साबळे यांनी पाहिली.