महाबळेश्वर (प्रतिनिधी) – क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिराचे राजोपाध्याय वेदमूर्ती परशुराम राजाराम महाबळेश्वरकर (वय ९२) यांचे निधन झाले. ते पंचक्रोशीत बाळकाका या नावने सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते जुन्या पिढीतील जाणते पुरोहित म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा पौराहित्याचा गाढा अभ्यास होता. महाराष्ट्राचे राज्यपाल शंकर दयाळ शर्मा यांच्याबरोबर त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते.
वाईचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जेव्हा क्षेत्र महाबळेश्वर येथे येत असत तेव्हा ते बाळकाका यांच्या सहवासात असत. क्षेत्र महाबळेश्वरच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.