Parliament Winter Session 2023: संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन नाताळच्या (25 डिसेंबर) आधी संपेल. वृत्तसंस्था पीटीआयने बुधवारी (8 नोव्हेंबर) सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सहसा कधी होते?
संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसच्या आधी ते संपते, परंतु यावेळी अद्याप अधिवेशनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.