Bollywood: अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट एकीकडे सुपरहिट ठरत असताना ख्रिसमसच्या दिवशी त्याने त्याच्या लाडकी मुलीचा चेहरा दाखवला आहे. आलिया भट्ट आणि रणबीरच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवू नये, असे आवाहन केले होते. मात्र अनेक दिवसांपासून चिमुकल्या राहाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अखेर आज आलिया आणि रणबीरने राहाची झलक चाहत्यांना दाखवली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
एका मुलाखतीत आलियाला राहाचा चेहरा न दाखवण्यामागचे कारण विचारले होते. त्यावर ती म्हणाली होती की, “आम्ही राहाचा चेहरा कोणालाच दाखवत नाही, असं अजिबात नाही. पण जेव्हा आम्हाला वाटले ही वेळ योग्य आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. तेव्हा आम्ही राहाची पहिली झलक दाखवू. ही गोष्टी आता कधी ही घडू शकते, लवकरच होऊ शकते. आम्ही ज्यावेळेस तयार होऊ, त्यावेळेस आम्ही आवश्य तिची पहिली झलक दाखवू.”
दरम्यान, आलिया आणि रणबीर यांनी 14 एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं. त्यानंतर जून 2022 मध्ये अभिनेत्रीने प्रग्नेंसीची घोषणा केली. तर आलियाने 6 नोव्हेंबर 2022 रोजी गोंडस मुलीला जन्म दिला होता. नुकतेच राहाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. आलिया आणि रणबीरने खास पद्धतीने लेकीचा वाढदिवस साजरा केला होता. आलियाने राहाची छोटीशी झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. या फोटोंमध्ये राहा केक स्मॅश करताना दिसत होती.