Yami Gautam : “हा एक अद्भुत प्रवासा होता…’; यामी गौतमच्या ‘बाला’ चित्रपटाला 4 वर्षे पूर्ण

Yami Gautam : यामी गौतमसाठी बाला हा चित्रपट खूप खास आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. आज 8 नोव्हेंबर रोजी ‘बाला’ प्रदर्शित होऊन 4 वर्षे झाली आहेत.
चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव सांगताना यामीने हा तिच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा चित्रपट का आहे हे सांगितले. या चित्रपटात, यामीने तिच्या परी मिश्रा या व्यक्तिरेखेला न्याय देत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
बालाच्या यशाबद्दल आणि त्याच्या 4 थ्या वर्धापन दिनाविषयी भावना व्यक्त करताना, यामी गौतम म्हणाली, “बाला रिलीज होऊन ४ वर्षे झाली आहेत आणि चित्रपटाला मिळालेल्या अभतपूर्व प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे एकूणच 2019 हे वर्ष खूप चांगले होते…
“उरी” सारख्या शौर्यपटापासून बालासारख्या विनोदीपटापर्यंत त्या एका वर्षात हे सर्व करणे निःसंशयपणे खूपच रोमांचक होते! दोन्ही चित्रपट केवळ यशस्वीच नव्हते तर उत्तम होते.”
यामी पुढे म्हणाली की, “या अद्भुत प्रवासाबद्दल मी खूप आभारी आहे आणि मला आशा आहे की मी चांगले आणि उत्तम काम करत राहीन जे प्रेक्षकांना आवडेल. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
यामी गौतमचे तिच्या कलेबद्दलचे समर्पण आणि बालाचे यश ही अभिनेत्री म्हणून तिच्या अष्टपैलुत्वाचा पुरावा आहे. ‘बाला’ आणि उरी: ए सर्जिकल स्ट्राइक’च्या यशानंतर, अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत नवनवीन उंची गाठली आणि ‘ए थर्सडे’, ‘लॉस्ट’, ‘दसवी’ सारख्या चित्रपटांसह ‘चोर निकल के भागा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘OMG 2’ पर्यंत बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर दिले आहेत.





