मुंबई : बीडच्या परळीत पुन्हा एकदा धनंजय मुंडेची जादू चालली आहे. कारण परळी आणि अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडे यांनी कब्जा मिळवला आहे.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 14 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजप फक्त 3 जागांवर विजयी. अद्याप 1 जागेचा निकाल येणे बाकी आहे. अंबाजोगाई हे परळी आणि केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संयुक्त आहे.
मविआच्या या विजयाने पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धूळ चारली असल्याचे दिसून येत आहे.