मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना बुधवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. यामुळे परमवीर सिंह 30 दिवसांत न्यायालयासमोर हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. यामुळे परमवीर सिंह यांच्यासमोरील अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
परमवीर सिंह यांच्या नावावर हरियाणामधील फरिदाबाद या ठिकाणी एक शेतजमीन. या शेतजमिनीची किंमत 1997 साली 22 लाख रुपये इतकी होती. या जमिनीचे मालक स्वत: परमवीर सिंह आहेत. आपल्या डिक्लेरेशनमध्ये त्यांनी स्वत: सांगितले आहे की त्यांना या जमिनीतून दरवर्षी 51 हजार रुपये मिळतात.
तसेच मुंबईच्या जुहू परिसरात एक फ्लॅट आहे. तो त्यांनी 2003 साली 48.75 लाख रुपयांना खरेदी केला होता. आज त्याची किंमत जवळपास 4.64 कोटी रुपये इतकी आहे. या संपत्तीमधून त्यांना दरवर्षी 24 लाख 95 हजार रुपये मिळतात. याशिवाय नवी मुंबईमधील नेरुळ परिसरात त्यांचा एक फ्लॅट आहे. त्याची खरेदी 2005 साली तीन कोटी 60 लाख 30 हजार रुपयांना केली होती. या संपत्तीत त्यांची पत्नी सविता सिंह यांचा शेअर असून त्यांना वर्षाला यातून 9.60 लाख रुपये मिळतात.
चंदीगडमध्ये 4 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये त्यांच्या दोन भावांचाही वाटा आहे. हरियाणामध्ये फरिदाबाद या ठिकाणी त्यांची एक जमीन आहे. या जमिनीची खरेदी 2019 साली 14 लाख रुपयांना करण्यात आली होती. ती एकूण 400.382 स्क्वेअर यार्ड इतकी आहे. ही संपत्ती परमवीर सिंह यांच्या नावावर आहे.
दरम्यान, परमबीर सिंहांच्या पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या स्थावर मालमत्तेची यादी सरकारकडे नोंद आहे. येत्या 30 दिवसांत जर ते तपास यंत्राणांच्या समोर हजर झाले नाहीत तर त्याच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची तयारी क्राईम ब्रॅंचकडून होउ शकते.