Pankaja Munde । भाजपने बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट जाहीर केले आहे. पंकजा मुंडे यांनी देखील त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळी संसदेत गेल्यावर नेमकं काय करणार याबाबत पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.
पंकजा मुंडे यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.कार्यकर्त्यांकडून देखील पंकजा यांचे ठीक ठिकाणी जोरदार स्वागत होताना दिसत आहे.बीड जिल्ह्यासाठी आपल्याकडे व्हिजन असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींकडे तरुणांसाठी एक हट्ट करणार असल्याचे देखील पंकजा यांनी म्हंटले आहे.
पंकजा यांनी बीडच्या विकासाचा आलेख मांडला. त्या म्हणाल्या,’बीड जिल्हा असा आहे तसा आहे मी ही ओळख पुसून टाकणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये 10 हजार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने जमीन देखील द्यायला तयार आहे. जिल्ह्यामध्ये एखादं मोठं चांगलं मेडिकल कॉलेज हवं, असं माझं स्वप्न आहे”, असं मोठं वक्तव्य मुंडे यांनी केलं आहे.
हे वाचल का ? Cm Eknath Shinde। गोविंदानंतर करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार ?