Lok Sabha Election 2024 । भाजपने बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने याआधी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याचे भुवया उंचावल्या गेल्या होत्या. । Pankaja Munde | Dhananjay Munde
मात्र, त्या पक्षाने दुसऱ्या यादीत गडकरी यांना स्थान देताना महाराष्ट्रातील अनेक जागांचा सस्पेन्स संपवला. डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर, दुसरीकडे पक्षाने बीड मध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे पंकजा मुंडे बीडमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. दरम्यान आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसंच धनंजय मुंडेंचा पक्ष सोबत असल्याने ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेतली यावेळी त्या बोलत होत्या.
आगामी लोकसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना पाठिंबा देणार का? याबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. “जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे बंधू धनंजय त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि आमचा भारतीय जनता पक्ष यांची राज्यामध्ये युती आहे. त्यामुळे नॅचरली जिल्ह्यामध्ये एकत्र आहोत.
त्यांचा पक्ष युतीत आल्यानंतर माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत. त्यानंतर आता मला लोकसभा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या येण्यामुळे जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून येत होत्या. त्यापेक्षा जास्त मतांनी मी निवडून यावे, यासाठी त्यांचे नक्कीच योगदान मिळेल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
आमच्या दोघींमध्ये चांगले कॉम्बिनेशन – । Pankaja Munde | Dhananjay Munde
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रीतम ताई मुंडे साहेब गेल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे करियर सोडून राजकारणात आल्या. 10 वर्ष संपूर्ण त्यांनी राजकारणात वाहून घेतले. आमच्या दोघींचे कॉम्बिनेशन खूप छान होतं. । Pankaja Munde | Dhananjay Munde
ज्या गोष्टी मी वेळेअभावी करु शकत नव्हते, त्या बाबींची जबाबदारी प्रीतम ताई घेत होत्या. धोरणात्मक निर्णय मी करायचे. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये चांगले कॉम्बिनेशन होते. भविष्यातही हेच कॉम्बिनेशन राहील. असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.