त्याने सर्वात पहिल्यांदा 2005 साली ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंतच्या प्रवासात त्याने हा विक्रम साकार केला. विजेतेपदाच्या लढतीत पंकजने सौरववर 1000 विरुद्ध 416 अशा गुण फरकाने विजय मिळवला. या क्रीडा प्रकारात दीर्घ गटात तब्बल 9 वेळा विश्वविजेता बनण्याची कामगिरी केली आहे.
अडवाणीने याआधी उपांत्य फेरीत देशबांधव रुपेश शाहचा 900-273 असा पराभव केला होता. तर कोठारीने उपांत्य फेरीत ध्रुव सितवालाचा 900-756 असा पराभव केला होता.
IBSF World Billiards Champion (Long Format) 🏆😊
This is for us India 🇮🇳🙏🏻 pic.twitter.com/kLEdRPpnnq— Pankaj Advani (@PankajAdvani247) November 21, 2023
पंकज अडवाणी यांची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. 1999 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केले. पंकजने इंग्लंडमध्ये वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. 2005 मध्ये त्याने IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. तो ग्रँड दुहेरी गाठणारा पहिला खेळाडू ठरला.
Lionel Messi | लिओनेल मेस्सीच्या ‘त्या’ जर्सीचा होणार लिलाव; जवळपास 90 कोटी….
त्याने भारतासाठी सुवर्णपदकही पटकावले आहे. आशियाई खेळ 2010 मध्ये पंकजला सुवर्णपदक मिळाले होते. त्याने एकेरीत भाग घेतला होता. याआधी 2006 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. दोहा येथे या स्पर्धेचे करण्यात आले होते.