नवी दिल्ली – भारतात बिलियर्डस आणि स्नूकरमध्ये नवोदितांसाठी कारकीर्द घडवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत भारताचा आंतरराष्ट्रीय बिलियर्डपटू पंकज अडवाणीने व्यक्त केले आहे.
विविध तेल कंपन्या किंवा रेल्वेमध्ये बिलियर्ड व स्नूकरपटूंना नोकरीही उपलब्ध होत आहे. आता ज्युनिअर वयोगटांतही दर्जेदार खेळाडू पुढे येत आहेत. त्यांना याच खेळात कारकीर्द घडवायची आहे. त्यांना सरकार आणि अन्य संघटनांनी प्रोत्साहन देणे, साहाय्य करणे आवश्यक आहे. बिलियर्ड हा श्रीमंत व्यक्तींचा खेळ असल्याचा आपल्याकडे समज आहे. मात्र, त्यात तथ्य नाही,फफ असे पंकजने सांगितले.