पंढरपूर : मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडूकीची मतमोजणी आता चुरशीची होत चालली आहे. पहिल्या काही टप्प्यात भगीरथ भालकेंनी आघाडी घेतली. परंतु 30 व्या मतमोजणी फेरीअखेर समाधान आवताडे यांची आघाडी कायम आहे. तब्बल 5910 मतांनी भाजप आघाडीवर आहे.
पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत भाजपची आघाडी कायम दिसून आली आहे. मागील काही फेऱ्यापासून सुरु झालेली भाजपची आघाडी कायमच राहत असल्याचे दिसत आहे. 26 व्या आणि 27 व्या फेरीअखेरच्या मतमोजणीची आकडेवारी समोर आली आहे. दोन्ही फेऱ्यांमध्ये भाजपला आघाडी कायम ठेवण्यात यश आले आहे.
भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली होती. महाविकास आघाडीकडून कोणाला जागा मिळणार याबाबत चुरस लागली होती. शेवटी भारत भालके यांचे वारसदार भगीरथ भालके यांना जागा देण्यात आले.
दरम्यान मागच्या काही वर्षात मंगळवेढ्याच्या ३५ गावांना पाणी देण्याचा राष्ट्रवादीने शब्द दिला होता. परंतू राष्ट्रवादीकडून हा शब्द प्रमाण मानला न गेल्याने राष्ट्रवादीला याचा फटका बसणार अशी चर्चा होती. दरम्यान पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात भालकेंना मताधिक्य होते.