West Bengal Election Results 2021 : शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन म्हणाले,…

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या या कलानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटले आहे. शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या कल आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं होतं. देशात करोना स्थिती असताना भाजपा पूर्ण ताकदीने पश्चिम बंगाल निवडणुकीत उतरली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.