पुणे – रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यासाठी गेल्यानंतर सराईताने गुन्हे शाखेत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर पालघनने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. रियाज ऊर्फ बबलू खाजाभाई जिडगे (32, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह चौघांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.