मुंबई – बॉलीवूड अभिनेता सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अभिनेत्री शहनाज गिल आणि श्वेता तिवारी यांची मुलगी पलक तिवारीही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशात पलकने नुकतीच एका मुलाखतीत सलमान खान आणि चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली.
पलक तिवारी ही एक सोशल मीडिया स्टार आहे आणि ती किसी का भाई किसी की जानमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पलकने चित्रपट आणि सलमानबद्दल सांगितले की, ‘मला वाटले की सलमानसोबत एकाच सेटवर राहणे माझ्यासाठी खूप कठीण होते आणि मी नेहमी नर्व्हस होते. सलमान खान सर सेटवर वडिलांसारखा होते. त्यांनी माझीसह सर्वांची काळजी घेतली.’
किसी का भाई किसी की जान, सलमान खान फिल्म्स प्रोडक्शन सलमा खान निर्मित, फरहाद सामजी दिग्दर्शित आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे आणि त्याआधी चित्रपटाची दोन गाणी रिलीज झाली आहेत.