मुंबई – अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी गेल्या वर्षी एकत्र दिसले होते. त्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसले आणि इब्राहिम – पलक एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
सुपरस्टार सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांवर आता स्वःताहा पलकनेच खुलासा केला आहे.
श्वेता तिवारीची मुलगी इब्राहिम आणि पलक यांच्यातील नातं बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. दोघे गेल्या वर्षी पहिल्यांदा एकत्र दिसले होते आणि पापाराझींनी त्यांचे फोटो शेअर केले होते. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा पलकला तिच्या इब्राहिमला डेट करण्याच्या बातम्यांबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “प्रेमाचा अंदाज कधीच बांधता येत नाही, सध्या काम ही माझी पहिली प्राथमिकता आहे. माझ्या करिअरसाठी हा महत्त्वाचा काळ आहे, त्यामुळे मी माझा फोकस त्या दिशेने ठेवणार आहे.” पलक आणि इब्राहिम पापाराझींनी क्लिक केलेल्या फोटोंमधून त्यांचे चेहरे लपवण्याचा प्रयत्न करत होते. अभिनेत्री इब्राहिमला डेट करण्याबद्दल बोलली आणि म्हणाली, “आम्ही अधूनमधून बोलतो पण मी कोणाला डेट करत नाहीये. माझा असा काही मूड नाहीये.”
पुढे बोलताना पलक म्हणाली की,’ती दोन फीचर फिल्म्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काम हेच आयुष्यातील “फक्त फोकस” आहे, ज्यामुळे मी आनंदी आणि समाधानी आहे. त्यामुळे मी अफवांवर नाही तर करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.”
पलक सध्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. यात सलमान खान, पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा 2014 च्या तमिळ चित्रपट वीरमचा रिमेक आहे, जो एका माणसाची कथा सांगते ज्याच्या चार लहान भावांना त्याने लग्न करावे जेणेकरुन त्यांनीही लग्न करावे.