entertainment news – ‘ अभिनेत्री श्वेता तिवारीला परिचयाची गरज नाही. तिचे नाव आता एक ब्रँड आहे. ‘कसौटी जिंदगी के’ मधील प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारून तिने घराघरात आपले नाव कमावले.
‘मैं हूं अपराजिता’ने तिने रातोरात प्रसिद्धी मिळवली. श्वेताने सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ जिंकला. ती नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते, अशात आता श्वेता पुन्हा एकद चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीने रोहित शेट्टीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिग्दर्शकाच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा एक भाग असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. या चित्रपटात श्वेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
श्वेता तिवारी रोहित शेट्टी सोबतच्या फोटोंमध्ये फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. सिंघम अगेन श्वेता तिवारी साठी हा मोठा जॅकपॉट आहे, कारण या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंगसारखे स्टार्स आहे. श्वेता तिवारी रोहित शेट्टीच्या या पोलीस विश्वात सामील झाली आहे.
रोहित शेट्टी ने ‘सिंघम अगेन’चे शूटिंग सुरू केले आहे. 16 सप्टेंबरला अजय देवगण, रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांनी मुहूर्त पूजेदरम्यानचे फोटो शेअर केले होते. मुंबईतीलच एका स्टुडिओमध्ये याची सुरुवात होत आहे. या रिपोर्ट्सनंतर चाहतेही चांगलेच उत्साहित झाले. पुढच्या वर्षी 2024 मध्ये स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याची माहिती आहे.