रावलपिंडी : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास बुधवार पासून पाकिस्तान येथील रावलपिंडी मैदानावर सुरूवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ६८.१ षटकात ५ बाद २०२ धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.
At Stumps on Day 1: SL 202/5 (68.1 Ov) Dickwella 11*(13), de Silva 38*(77) #PAKvSL pic.twitter.com/KcOdQPjGVm
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 11, 2019
श्रीलंकेकडून सलामीवीर दिमुथ करूणारत्ने याने ५९, ओशदा फर्नांडोने ४० तर एंजेलो मॅथ्यूजने ३१ धावांची खेळी केली. पाककडून गोलंदाजीत नसीम शाहने २ तर उस्मान खान, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद अब्बासने प्रत्येकी १ गडी बाद केला.
Naseem Shah has sent Angelo Mathews on his way, but now bad light has stopped play 😔
🇱🇰 are 202/5.#PAKvSL LIVE 👉 https://t.co/CKfg2Y3ATf pic.twitter.com/jnhPY7k6JU
— ICC (@ICC) December 11, 2019
खराब सूर्य प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेपेक्षा लवकर संपविण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा धनंजया डी सिल्वा ३८* तर निरोशन डिकवेला ११* धावांवर खेळत होता.