कराची : पाकिस्तानने दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा २६३ धावांनी पराभव करत दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेवर १-० ने कब्जा केलाद आहे. पाकने सुमारे दशकभरानंतर मायदेशात होणारी कसोटी मालिका जिंकली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. दुस-या डावात १७४ धावांची खेळी करणारा आबिद अली सामनावीर ठरला.
Pakistan won the 2nd Test by 263 runs and clinch the series.
PAK 191& 555/3d vs SL 271 & 212-all out (62.5 ov, Oshada Fernando 102, Niroshan Dickwella 65 : Naseem 5/31,Yasir Shah 2/84) #PAKvSL pic.twitter.com/BsduP29hPi
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 23, 2019
सामन्याच्या अखेरच्या दिवशी आज पाकिस्तानने केवळ २.४ षटकांत विजय संपादित केला. यादरम्यान श्रीलंकेला एकही धाव काढता आली. पाकच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा दूसरा डाव अवघ्या २१२ वर गुंडाळला. १६ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाहने दुस-या डावात सर्वाधिक ५ गडी बाद केले.
A BIG victory for Pakistan. Young Naseem Shah picks up five wickets, and Sri Lanka are bundled out for 212.
Pakistan win by 263 runs! What a performance from the hosts 👏#PAKvSL pic.twitter.com/mcUOMdxX6T
— ICC (@ICC) December 23, 2019
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकचा पहिला डाव केवळ १९१ वर आटोपला होता. त्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात २७१ धावा करत ८० धावांची आघाडी घेतली होती.
दरम्यान, दुस-या डावात पाकिस्तानच्या फलंदाजी शानदार कामगिरी केली. संघाच्या चार फलंदाजांनी शान मसूद (१३५), आबिद अली (१७४), अजहर अली (११८) आणि बाबर आझम (१००*) ने शतकी खेळी केल्या. या खेळीच्या जोरावर पाकने श्रीलंकेसमोर ४७६ धावांते मोठं आव्हान ठेवलं होतं पण नसीम शाहच्या गोलंदाजीसमोर लंकेचा डाव २१२ वर आटोपला.
सामन्याच्या पाचव्या दिवशी आज श्रीलंकेने ६०.१ षटकात ७ बाद २१२ वरून पुढे खेळ सुरू केला. दिवसाच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर नसीम शाहने रिजवानकरवी लसिथ एंबुलदेनियाला शून्यावर झेलबाद केले. त्यानंतर पुढील षटकांत (६२ व्या) यासीर शाहने ओशादा फर्नांडोला १०२ धावांवर बाद केलं. शेवटच्या विकेटच्या रूपात विश्वा फर्नांडो बाद झाला, त्याला नसीम शाहने पायचीत केलं आणि श्रीलंकेचा संपूर्ण संघ ६२.५ षटकात २१२ वर आटोपला. पाकच्या नसीम शाहने ३१ धावा देत ५ तर यासिर शाहने ८४ धावा देत २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान : पहिला डाव – १९१ आणि दुसरा डाव ३ बाद ५५५ घोषित ( मसूद १३५, आबिद १७४, अझर ११८, आझम नाबाद १००, कुमारा २-१३९) वि.वि. श्रीलंका : पहिला डाव- सर्वबाद २७१ आणि दुसरा डाव- सर्वबाद २१२( ओशदा फर्नांडो १०२, निरोशन डिकवेला ६५, नसीम शाह ३१-५, यासिर शाह ८४-२).