दुबई – यूएईमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय दांपत्याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हिरेन अधिया त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत यूएईमध्ये एका व्हिलामध्ये वास्तव्यास होते. घराच्या साफसफाईसाठी त्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मर्यादीत कालावधीसाठी घरी बोलावले होते.
कंपनीकडून कामासाठी आलेल्यांमध्ये एक पाकिस्तानचा नागरिक होता. कामाच्या निमित्ताने घरातली संपत्ती पाहून पाकिस्तानचा नागरिक असलेल्या व्यक्तीने दरोडा टाकण्याची योजना तयार केली. काम संपल्यावर पाकिस्तानचा नागरिक असलेल्या व्यक्तीने शारजा सुपर मार्केटमधून धारदार चाकू विकत घेतला. तो लूटमार करण्याचा प्रयत्न करत असतानाच घर मालक हिरेन अधिया जागे झाले.
हिरेन यांना पाहून पाकिस्तानच्या नागरिक असलेल्या व्यक्तीने चाकूने हल्ला केला. तब्बल दहा वेळा पाकिस्तानच्या नागरिकाने हिरेन यांच्या पोटात चाकू खुपसला. हल्लेखोराला अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिरेन यांच्या पत्नीवरही पाकिस्तानच्या नागरिकाने चाकूने हल्ला केला. तब्बल चौदावेळा हिरेन यांच्या पत्नीवर हल्लेखोराने चाकूने घातक वार केले. चाकू हल्ल्यात हिरेन अधिया आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.