शाहांच्या ‘दुसरा स्ट्राईक’च्या ट्विटवर पाकिस्तानने म्हंटले…. 

पुणे – विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ८९ धावांनी हरवत धूळ चारली. विश्वचषकादरम्यान भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय आहे. या विजयानंतर टीम इंडियावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक अशा शुभेच्छा ट्विटरद्वारे दिल्या. या ट्विटला पाकिस्तान लष्कराचे पाकिस्तानचे मेजर जनरल आणि मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन (आईएसपीआर) चे महानिदेशक आसिफ गफूर यांनी उत्तर दिले आहे.

आसिफ गफूर म्हणाले कि, प्रिय अमित शाह, तुमचा संघ सामना जिंकला. त्यांनी खूप चांगला खेळ केला. मात्र दोन वेगळ्या स्तरावरील गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे स्ट्राइक आणि या सामन्याची तुलना केली जाऊ शकत नाही. तसेच जर तुम्हाला शंका असेल तर भारतीय हवाई दलाने २७ फेब्रुवारी रोजी हवाई हद्द ओलांडून केलेल्या हल्ल्याला आम्ही नवशेरामध्ये दिलेल्या उत्तरात भारताची दोन जेट विमाने आम्ही पाडली होती. त्यामुळे तुम्ही केवळ आश्चर्य करत बसा, असं गफूर यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.