अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा- शिवसेना

मुंबई – अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. कारण श्रीरामाने 350 खासदार आणि सत्ता दिली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. रामाला त्याच्या जन्मस्थानी एक हक्काचं छप्पर देऊ शकत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून मोदी सरकारवर निशाणा साधत ‘राममंदिराचा जनादेश, वनवास संपवा!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून भाजपला इशारा देत आपली भूमिका मांडली आहे की,’ जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. 350 खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला 350 खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही? ‘ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.