#U19CWC : अफगाणिस्तानचा पराभव करत पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल

बेनोनी : मोहम्मद हुरैरा याच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव करत १९ वर्षाखालील गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.आता उपांत्य फेरीत पाकिस्तानची गाठ बलाढ्य भारताशी होणार पडणार आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने ४९.१ षटकांत सर्वबाद १८९ धावा करत पाकसमोर १९० धावांचे आव्हान ठेवले होते. अफगाणिस्तान संघाकडून फरहान जाखिलने ४०, अब्दुल रहमानने ३०, रह्नानुल्लाह खानने २९ आणि आबिद मोहम्मदीने २८ धावा केल्या. पाककडून मोहम्मद आमिर खानने ३, फहाद मुनीरने २ तर कासिम अकरम, आमिर अली आणि ताहिर हुसैनने प्रत्येकी १ गडी बाद केला.

विजयासाठीचे १९० धावांचे आव्हान पाकिस्तानने ४१.१ षटकांत ४ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाककडून फलंदाजीत मोहम्मद हुरैराने ६४, मोहम्मद हारिसने नाबाद २९, हैदर अलीने २८ आणि कासिम अकरमने नाबाद २५ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने २ गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.