कराची – पाकिस्तानने टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 63 धावांनी पराभव केला व 1-0 अशी आघाडी घेतली.
पहिल्या सामन्यात महंमद रिझवानने 52 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. टी-20 मधील त्याचे हे 11 वे अर्धशतक आहे. रिझवान आणि हैदर अलीच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 6 बाद 200 धावांचा डोंगर उभारला होता.
हैदर अलीने 39 चेंडूत 68 धावांची खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ 137 धावांवर बाद झाला.
या सामन्यात रिझवानने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1500 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी बाबर आझम, महंमद हफीज, शोएब मलिक आणि उमर मलिक यांनी अशी कामगिरी केली आहे.
रिझवानने 1500 धावांचा पल्ला पार करतानावेस्ट इंडिजच्याच ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. रिझवानने अवघ्या 42 डावात ही कामगिरी करुन दाखवली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 1500 धावा करण्यासाठी गेलने 44 सामने घेतले. सर्वात कमी डावात 1500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये बाबर आझम, विराट कोहली, ऍरन फिंच आणि लोकेश राहुल यांचा समावेश आहे.