पुणे – आयकॉन ग्रुप, पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजित चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत गटसाखळी फेरीत लॉ चार्जर्स, टेनिसनट्स, पीवायसी सॅफायर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत लॉ चार्जस संघाने पीवायसी पर्ल्स संघाचा 18-5 असा सहज पराभव केला.
विजयी संघाकडून भूषण तळवळकर, नितीन गवळी, राहुल मंत्री, संदीप माहेश्वरी, नितीन खैरे यांनी सुरेख कामगिरी केली. अन्य लढतीत टेनिसनट्स संघाने मॉंट व्हर्ट प्रीस्टाइन संघाचा 16-9 असा तर, पीवायसी सॅफायर्स संघाने टी-20 महाराष्ट्र मंडळ संघाचा 17-12 असा पराभव केला.